राधा अष्टमी.. | #आजचाविषय - 14 सप्टेंबर ,#सुंदर,#यूस्फुल,#इनस्पाइरिंग,चूक | Blog Post by Archana rahul Mate patil | मॉम्सप्रेसो

राधा अष्टमी..

|Sep 14, 2021
headerImg

राधा अष्टमी..

राधे राधे जपा करो..
कृष्ण नाम रस पिया करो..

आज 14 सप्टेंबर मंगळवार भाद्रपद शुद्ध अष्टमी या दिवशी परम आल्हादिनी श्री कृष्णप्रिया, सर्वेश्वरी, श्री राधा रानी यांचा जन्मोत्सव सोहळा.. ज्याप्रमाणे आपण श्री कृष्ण अष्टमी हा उत्सव साजरा करतो अगदी त्याचप्रमाणे भगवती राधा राणी व बाल कृष्णाची सहचारी म्हणून श्री राधे चे आगमन केले पाहिजे...हेच श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय आहे..

उपास्य तत्व श्री ब्रजनंदन कृष्ण..
प्राप्त धाम श्री वृंदावन..
उपासना तीच जी श्री राधा रानी ने केली
त्याच प्रमाण आहे ,श्रीमदभागवत महापुराण..

आपले आराध्य भगवंत श्रीकृष्ण हे आपले उपास्य दैवत आहे तर श्री राधा रानी भक्तांसाठी आश्रय तत्व आहे.. श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठीश्री राधेला श्रीकृष्ण चरण सेवा करण्यासाठी प्रार्थना केली तर ते लवकर फळाला येते..

भगवंत आपल्याला उपासना आराधना व भक्तीमुळे प्रसन्न होतात यात शंकाच नाही,परंतु भगवंताला सर्वाधिक प्रिय जर काही असेल तर ते म्हणजे श्री राधे चे नाव... राधे-राधे म्हणतात भगवंत आनंदाने नाचतात...
तसं तर भगवंताची सेवा करण्यात राधेचे सर्वप्रथम नाव आहे... पण भगवंत मात्र श्री राधराणीची सेवा करण्यात मग्न असतात...

वृंदावन निवासी श्री वृषभानु व श्री कीर्तीच्या कुमारी या दांपत्याच्या घरी श्री राधा रानी यांनी जन्म घेतला...
श्री कृष्ण आणि राधा यांच्या पहिल्या भेटीचे वर्णन आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपात आढळली आहे...

एक वेळेस श्री राधा रानी गोलोक मध्ये उपस्थित नव्हत्या तर त्यावेळेस त्यांच्या सखी समवेत श्रीकृष्ण विहार करत होते..   त्याच वेळेस त्यांचे परममित्र श्री दामा हे भगवंता च्या दर्शनासाठी उत्सुक होते...मी श्री राधा राणी कडे गेले असता आधाराने आपल्या कामात व्यस्त होत्या...इतके की त्यांना भानच राहिले नाही भक्त मंडळी आली आहे त्यांच्या स्वागतासाठी सज्ज व्हावे... हे पाहून श्रीदामाला खूप क्रोध आला..
व त्याच वेळेस त्यांनी श्री राधा राणीला शाप दिला की,ज्या क्रमाने मी भगवंत श्रीकृष्णाच्या करण्यापासून दूर आहे व त्याच व्याकुळतेने त्यांच्या दर्शनासाठी इच्छुक आहे तरीसुद्धा आमची भेट झाली नाही अगदी त्याच प्रमाणे तो देखील या लोकांपासून दूर होऊन पृथ्वीवर जन्म घेशील व तेथे देखील तुला श्रीकृष्णाचा कित्येक वर्ष विरह सहन करावा लागेल...

गोलोका मध्ये श्रीकृष्ण यांच्याकडून श्री राधा रानी ने असे वचन घेतले होते की, मी या पृथ्वीवर जन्मदर घेईन.  पण मी तोपर्यंत माझे डोळे उघडणार नाही जोपर्यंत तुम्ही मला तेथे येऊन दर्शन देत नाही... असे म्हणतात की राधा राणी चे जन्मता डोळे बंद होते.. ज्या क्षणी श्रीकृष्ण यशोदा व नंद यासोबत श्री वृक्ष भानू व कीर्तीजा यांच्या वाड्यात आले त्यावेळेस श्रीकृष्णाला पाहून श्री राधा रानी ची नेत्र परत आले..

यामध्ये असेही म्हटले जाते की ज्या वेळेस भगवांत श्रीकृष्णाला. पाहण्यासाठी वृषभानु व कीर्तीच्या कुमारी यांच्यासोबत राधा राणी गोकुळच्या नंद यशोदेच्या वाड्यांमधील आली असता त्यांची प्रथम दर्शन झाले...

राधा राणी च्या प्रमुख सख्या म्हणून ललिता विशाखा आहेत.. राधा राणी श्रीकृष्ण आहेत श्रीकृष्ण हेच राधाराने आहेत.. सर्वमय एकमय आहेत..भगवंत श्रीकृष्ण स्वतःचे नाव ऐकल्यावर देखील एवढे प्रसन्न होत नाही जितका आनंद त्यांना श्री राधीचे नाव ऐकल्यानंतर होतो...


राधे राधे रटो चले आएंगे बिहारी..
राधा मेरी गंगा तो धार है बिहारी..
राधा मेरी चुनरी तो कंगन है बिहारी..
राधा मेरी चंदा तो चकोर है बिहारी..
राधा राणी गोरी तो सावली बिहारी..
राधा रानी भोली तो चंचल है बिहारी..

✍️✍️💞 Archu
💞
श्री राधा रानी की जय..

श्रीकृष्णाच्या जीवन कार्यात राधेचे अढळ असे स्थान आहे. श्री राधाकृष्ण यांच्या रासलीला तर सर्वपरिचित आहेच..श्री राधा राणी ला सन्मान म्हणून कृष्ण त्यांच्या अगोदर राधेचे नाव लावतात... प्रेमाचे प्रतिक म्हणून श्री राधाकृष्ण यांनी जगात अजरामर केले आहे..
त्यांच्या बाललीला तर अवर्णनीय आनंद अशा कथा माझ्याकडून तरी शब्दबद्ध होणार नाहीत.. नंतर कधी तरी नक्कीच प्रयत्न करीन. 

श्री राधा रानी की आरती..

आरती श्री वृषभानु सुता की
मंजूर मूर्ती मोहन ममता की..

त्रिविध ताप युत संसृती नाशिनी
विमल विवेक विराग विकासिनी
पावन प्रभुपदा प्रीती प्रकाशिनी
सुंदर तम छबी सुंदर ताकी...

मोनी मन मोहन मोहन मोहनी
मधुर मनोहर मूर्ती सोहनी
अविरल प्रेम अमीय रस दोहनी..
प्रिय अति सदा सखी ललिता की..

संत सेव्य संत मुनी जनकी
अमित दिव्य गुना गणकी..
आकर्षणे कृष्ण तन मन की
अती अमूल्य संपत्ती समता की.

कृष्णात मिका कृष्ण सहचारिणी.
चिन्मय वृंदा विपीन विहरिनी
जगतजननी जग दुःख निवारीनी
आदी अनादी शक्ती विभुताकी..


श्री राधा चरणी प्रार्थना..
कृष्णप्रिया दे मज कृष्ण प्रीतीता आलो शरण तुला..
करूनाकरा करी मजवरी करूना आलो शरण तुला ..
कृष्णात्मिका करी मजवरी ममता आलो शरण तुला ..
भक्त प्रिया पाजी मजा प्रेमा अमृता..आलो शरण तुला
सखी यूता करी  मजसी सख्यता आलो शरण तुला..
कीर्तीसुता करी मजवरी मातृता आलो शरण तुला ..
कृपानिधी करी मजवरी अनुकंपा आलो शरण तुला..
दयायूता चरणी देई मज थारा आलो शरण तुला..

भानूसुता घालवी माझी तृष्णा आलो शरण तुला..
  पद्मासुता अगाध तुझा महिमा आलो शरण तुला..
ऊमानता घे पदरी या दिना आलो शरण तुला..

. श्री राधे ला पाळणा..
पहिल्या दिवशी भानू भावनात
राधा प्रगटली शक्ती सहित
पुत्रीला पाहुनी दोघे आनंदात
जो बाळा जो जो रे झो..

दुसऱ्या दिवशी भानू नगरीत
उत्सव केला थाटामाटात
तहानभूक विसरले आनंदात
जो बाळा जो जो रे जो..

तिसऱ्या दिवशी अनुसूया सती
राधेला पाहुनी धन्य मानती
धन्य ही नगरी बरसाना म्हणती
जो बाळा जो जो रे जो..

चवथ्या दिवशी यशोदा सहित
राजानंद येती भानू महालात
राधेला अर्पीती वस्त्र आनंदात..
जो बाळा जो जो रे जो..

पाचव्या दिवशी ऐकु नी वार्ता
कीर्ती भानूचे सर्व गणगोत
झाले मग्न सर्व हार अर्पिता
जो बाळा जो जो रे जो..

सहाव्या दिवशी भाग्यविधायनी
सटवी येते घेऊन लेखणी
राधेला पाहुनी विसरली जननी
जो बाळा जो जो रे जो...

सातव्या दिवशी विप्र प्रबोधा
ही हरील भक्त भव बाधा
नाव ठेविले सर्वेश्वरी राधा
जो बाळा जो जो रे जो...


श्री राधा रानी की जय
महाराणी की जय जय
बोलो बरसाने वाली की
जय जय जय  बोलो
भानू दुलारी की जय जय ..


वृंदावन मे राधे राधे..
श्यामकुंज राधे राधे..
राधा कुंड मे राधे राधे..
गोकुल मे है राधे राधे ..y
यमुना घाटमे राधे राधे..
बरसाने मे राधे राधे..
पेडो पे हे राधे राधे..
वृक्ष बोले राधे राधे ..
मैया बोले राधे राधे..
गोपी बोले राधे राधे..
बच्चा बोले राधे राधे ..
बंसी की धून बोले राधे राधे..
मुरली की स्वर बोले राधे राधे.
ग्वाल बाल सब बोले राधे राधे..

राधे राधे हो राधे राधे..
राधे राधे हो राधे राधे..

गोविंद राधे गोपाल राधे..
राधे राधे राधे राधे राधे..
राधे राधे राधे राधे राधे..

राधा अष्टमी चा हा उपवास एकभुक्त राहून करावा.. तुमच्याकडे राधाष्टमी साजरी करतात का केली तर कशा पद्धतीने हे मला कमेंट मधून नक्की कळवा काही चूक झाली असल्यास माफी...

✍️✍️💞 Archu💞

Disclaimer: The opinions expressed in this post are the personal views of the author. They do not necessarily reflect the views of Momspresso.com. Any omissions or errors are the author's and Momspresso does not assume any liability or responsibility for them.
2000+
Contributions
Q&A
How many users have earned with Momspresso MyMoney so far?
500 moms5000 momsMore than 50,000 moms

TODAY'S BEST

TODAY'S BEST